Wednesday, January 23, 2008

गाडीबरोबर पूजा "फ्री'

अखेर गाडी घेतली... एक स्वप्न पूर्ण झालं. आता शोरूममधून थेट मंदिरात जायचं आणि पूजा करूनच गाडी घरी न्यायची... "यजमान, करायची ना सुरवात?' या प्रश्‍नानं मनातले विचार थांबतात. वळून पाहावं, तर साक्षात भटजीबुवाच समोर उभे... पूजेच्या साहित्यासह!
हे सगळं खरं की स्वप्न..? रमण गुप्ता विचार करू लागला. राजधानी दिल्लीतल्या एका आघाडीच्या आय.टी. कंपनीतला हा मॅनेजर. गाडी घ्यायची, हे चारचौघांसारखंच त्याचं स्वप्न. वृत्तीनंही चारचौघांसारखाच धार्मिक. कोणत्याही कामाचा श्रीगणेशा पूजेनेच करणारा. "मारुती'साठी पैशांची जुळणी करून शोरूममध्ये गेला आणि चाव्या ताब्यात घेताच त्याला परमानंद झाला. शोरूमपासून जवळच मारुतीचं मंदिर. तिथं पूजा उरकून घरी जावं, हा विचार सुरू असतानाच भटजीबुवा सामोरे आले. म्हणाले, ""मी पंडित राधामोहन त्यागी. गाडी खरेदी केल्यानंतर करायच्या धार्मिक विधींसाठी शोरूमच्या मॅनेजरनं माझी खास नेमणूक केलीय. तुम्हाला सुविधा देण्यासाठीच आम्ही आहोत. सर, काही चिंता करू नका. तुमच्या भावनांची मला जाणीव आहे...
''अवघ्या पंधरा मिनिटांत भटजीबुवांनी गाडीची साग्रसंगीत पूजा केली. नारळ फोडला; गंधाने गाडीवर स्वस्तिकाचं शुभचिन्ह रेखाटलं; आरतीही केली. रमणच्या बरोबर पत्नी सीमाही होती. या अनोख्या "सर्व्हिस'मुळं ती भारावली. ""कंपनीनं विनामोबदला दिलेली सेवा म्हणजे सुखद धक्काच आहे,'' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आणि पती-पत्नी गाडी घेऊन रवाना झाले.
दिल्लीतल्या अनेक शोरूममध्ये आता हे चित्र दिसू लागलंय. गाडीबरोबर अनेक गोष्टी "फ्री' देण्याची स्पर्धा आता नव्या वळणावर आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं नव्या किमती वस्तूची पूजा केली, की खरेदी करणाऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसतं, ही बाब डीलर मंडळींनी अचूक हेरली आहे. घरोघर जाऊन पूजा करणाऱ्या पुरोहित मंडळींनाही एकाच जागी काम मिळालं आहे. याखेरीज, गणपतीबाप्पा आणि इतर देवदेवतांच्या छोट्या प्रतिमा "डॅशबोर्ड'वर स्थापित करून "शुभचिन्हासोबत सुखाचा प्रवास करा,' असे "साइनबोर्ड'ही शोरूममालक झळकवू लागले आहेत. दर वर्षी 15 टक्‍क्‍यांनी वृद्धिंगत होत असलेल्या भारतीय मोटार बाजारातील हालचाल वाढल्याचं आता पुरोहितांनाही दिसू लागलंय. कृष्णमूर्ती झा हे पुरोहित म्हणतात, ""लोकांचं उत्पन्न वाढलंय आणि खर्चही. गाड्या खरेदी करण्याकडे असलेला लोकांचा ओढा पाहता, आगामी काळात आमच्यासारख्या अनेक पुरोहितांना शोरूममध्ये काम मिळेल, अशी चिन्हं आहेत. हल्ली ग्राहकाला एकाच ठिकाणी अनेक सेवा हव्या असतात. त्यामुळं आम्हाला काम मिळतंय, हे शुभलक्षणच!अखेर गाडी घेतली... एक स्वप्न पूर्ण झालं. आता शोरूममधून थेट मंदिरात जायचं आणि पूजा करूनच गाडी घरी न्यायची... "यजमान, करायची ना सुरवात?' या प्रश्‍नानं मनातले विचार थांबतात. वळून पाहावं, तर साक्षात भटजीबुवाच समोर उभे... पूजेच्या साहित्यासह!
हे सगळं खरं की स्वप्न..? रमण गुप्ता विचार करू लागला. राजधानी दिल्लीतल्या एका आघाडीच्या आय.टी. कंपनीतला हा मॅनेजर. गाडी घ्यायची, हे चारचौघांसारखंच त्याचं स्वप्न. वृत्तीनंही चारचौघांसारखाच धार्मिक. कोणत्याही कामाचा श्रीगणेशा पूजेनेच करणारा. "मारुती'साठी पैशांची जुळणी करून शोरूममध्ये गेला आणि चाव्या ताब्यात घेताच त्याला परमानंद झाला. शोरूमपासून जवळच मारुतीचं मंदिर. तिथं पूजा उरकून घरी जावं, हा विचार सुरू असतानाच भटजीबुवा सामोरे आले. म्हणाले, ""मी पंडित राधामोहन त्यागी. गाडी खरेदी केल्यानंतर करायच्या धार्मिक विधींसाठी शोरूमच्या मॅनेजरनं माझी खास नेमणूक केलीय. तुम्हाला सुविधा देण्यासाठीच आम्ही आहोत. सर, काही चिंता करू नका. तुमच्या भावनांची मला जाणीव आहे...
''अवघ्या पंधरा मिनिटांत भटजीबुवांनी गाडीची साग्रसंगीत पूजा केली. नारळ फोडला; गंधाने गाडीवर स्वस्तिकाचं शुभचिन्ह रेखाटलं; आरतीही केली. रमणच्या बरोबर पत्नी सीमाही होती. या अनोख्या "सर्व्हिस'मुळं ती भारावली. ""कंपनीनं विनामोबदला दिलेली सेवा म्हणजे सुखद धक्काच आहे,'' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आणि पती-पत्नी गाडी घेऊन रवाना झाले.
दिल्लीतल्या अनेक शोरूममध्ये आता हे चित्र दिसू लागलंय. गाडीबरोबर अनेक गोष्टी "फ्री' देण्याची स्पर्धा आता नव्या वळणावर आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं नव्या किमती वस्तूची पूजा केली, की खरेदी करणाऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसतं, ही बाब डीलर मंडळींनी अचूक हेरली आहे. घरोघर जाऊन पूजा करणाऱ्या पुरोहित मंडळींनाही एकाच जागी काम मिळालं आहे. याखेरीज, गणपतीबाप्पा आणि इतर देवदेवतांच्या छोट्या प्रतिमा "डॅशबोर्ड'वर स्थापित करून "शुभचिन्हासोबत सुखाचा प्रवास करा,' असे "साइनबोर्ड'ही शोरूममालक झळकवू लागले आहेत. दर वर्षी 15 टक्‍क्‍यांनी वृद्धिंगत होत असलेल्या भारतीय मोटार बाजारातील हालचाल वाढल्याचं आता पुरोहितांनाही दिसू लागलंय. कृष्णमूर्ती झा हे पुरोहित म्हणतात, ""लोकांचं उत्पन्न वाढलंय आणि खर्चही. गाड्या खरेदी करण्याकडे असलेला लोकांचा ओढा पाहता, आगामी काळात आमच्यासारख्या अनेक पुरोहितांना शोरूममध्ये काम मिळेल, अशी चिन्हं आहेत. हल्ली ग्राहकाला एकाच ठिकाणी अनेक सेवा हव्या असतात. त्यामुळं आम्हाला काम मिळतंय, हे शुभलक्षणच!