रासायनिक खतांचा कृत्रीम तुटवडा - शासकीय व राजकीय संरक्षणात व्यापाय्रांकडुन शेतकय्रांची राजरोसपणे लुट सुरू
आशिष बडवे - १२ जुलै
नागपुर - मागील जुन महिन्यात सुरू असलेल्या रासायनिक खताचा अभुतपुर्व तुटवडा पाहता आता व्यापाय्रांनी संधीचा फायदा घेवुन व आपल्या राजकीय प्रस्ताचा वापर करुन सरकारी अधिकाय्रांच्या संगनमताने राजरोसपणे काळाबाजार सुरू केला असुन शेतकय्रांचा अंत सरकारने पाहू नये अन्यथा शेतकरी आपल्या हातात कायदा घेऊन खताचा काळा बाजार करणाय्रा व्यापाय्रांना व त्यांना राजकीय संरक्षण देणाय्रां राजकीय नेत्याला धडा शिकवतील असा निर्वाणीचा ईशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी एकापत्रकाव्दारे दिला आहे. डी. ए. पी. खताची किंमत ४८५ रू असुन अधिकारीच ही बँग ५५० रूपयाला विका अशी मुभा व्यापाय्रांना देत असुन पोलीस संरक्षणात हे व्यापारी शेतकय्रांकडुन ६०० रू. प्रती बँग वसुल करीत आहे. जे शेतकरी वरची रक्कम मोजत आहे त्यांना हवा तेवढा डी. ए. पी. चा पुरवठा होत आहे. यामध्येच कृषी केंद्र वाले राजकीय नेत्यांना आपल्या हातात ठेवण्यासाठी त्यांना मात्र रासायनिक खताचा पुरवठा घरपोच करीत असल्याची माहिती शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार यांनी दिली. सामान्य अल्पभुधारक शेतकय्रांना मात्र मागील १५ दिवसापासुन दररोज कृषी केंद्रासमोर रांगा लावुन सुध्दा डी. ए. पी. ची बँग मिळत नाही एकीकडे दुबार पेरणीचा फटका व त्यानंतरही खताची अभुतपुर्व अडचण यांच्या मुळे शेतकरी गारद झाले असुन पश्चीम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात शेतकय्रांमध्ये रासायनिक खताच्या कृत्रीम टंचाईच्या भितीमुळे भयाचं वातावरण निर्माण झाले आहे. ज्या शेतकय्रांना ज्या खताची आज आवश्यकता नाही तो शेतकरी उद्या हे रासायनिक खत मिळणार नाही या भितीने आजचं त्याची अगावु उचल करीत आहे. व या संधीचा फायदा व्यापारी घेत असुन खताचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी शेतकय्रांनी आवश्यकते नुसारच खताची खरेदी करावी असे आव्हान सुध्दा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केले आहे.
खताच्या टंचाईमुळे बोगस रासायनिक खताची राजरोसपणे विक्री
सरकारी कंपनीचे खते व चांगली गुणवत्ता असणाय्रा कंपनीचे मिश्र खते बाजारात मिळत नसल्यामुळे मध्यप्रदेश मधल्या नविन नविन कंपन्यांचे रासायनिक खत विकण्याचा सपाटा लागला आहे. या खतामध्ये चुना आणि रेती ८० टक्के असुन शेतकय्रांना मोठ्या प्रमाणात बोगस रासायनिक खतामुळे चुना लागणार आहे. कृषी अधिकारी व प्रशासन यांना या बोगस रासायनिक खताची संपुर्ण माहिती असुन यांच्या संगनमतानेच ही विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी नेते मोहन मामीडवार व मोहन जाधव यांनी केला आहे. सरकारने रासायनिक खताचा काळाबाजार तात्काळ बंद केला नाही तर शेतकय्रांचे बदडा आंदोलन येत्या सोमवार पासुन सुरू करण्याचा ईशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे.
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Posts (Atom)