Tuesday, March 18, 2008
अत्याधुनिक शाळेचे पद्मश्री डाँ विजय भटकर यांच्या हस्ते उदघाटन
पुणे (आशिष बडवे) - राँयसी इंटरनँशनल स्कुल या नावाने नसँरी व प्ले ग्रुपसाठी अत्याधुनिक शाळेचे उदघाटन पद्मश्री डाँ विजय भटकर यांच्या हस्ते आज विश्रांतवाडी येथे करण्यात आले. यावेळी राँयसी इंटरनँशनल स्कुलचे चेअरमन श्री अभिजीत शिर्के, अध्यक्ष अनिरूध्द शिर्के, योगमहर्षी पाडेकर, डाँ. धुमाळ उपस्थीत होते. यावेळी डाँ. भटकर म्हणाले. की देशात व परदेशात विज्ञान, कृषी, औद्योगीक, तंत्रज्ञान शिक्षण, वैद्यकीय, औषध निर्मीती, आयुर्वेद, योगा, अन्नप्रक्रीया, जैवतंत्रज्ञान, उर्जा क्षेत्रात नविन तंत्रज्ञानाचा वापर व विकास हे उद्दीष्ट समोर ठेवले आहे. सध्याच्या आधुनिक शिक्षण पध्दतीत अद्यावत तंत्रज्ञान जगासमोर आणण्याचा राँयसी इंटरनँशनल स्कुलचा उपक्रम स्तुत्य आहे. एस्. एन. एस चँरिटेबल फाँउंडेशन च्या माध्यमातुन चालविल्या जाणाय्रा अनेक उपक्रमांपैकी हा एक आहे. एकविसाव्या शतकातील आव्हानांना नजरेसमोर ठेवणे हा शाळेचा उपक्रम आहे. संगीत खेळ, कला, क्रीडा, अशा गुणांनी संपंन्न अष्टपैलु व्यक्तीमत्व तयार करण्यासाठी मेहनत आहे. यातील सर्वोत्तम शिक्षण देणे हेच आमचे लक्ष असणार आहे. यासाठी महात्मा गांधी, अनुताई वाघ डाँ खानसे या सारख्या लोकांनी केलेल्या अभ्यासातुन तयार करण्यात आलेली Multiversity Gurukul ही संकल्पना फार उपयुक्त आहे. शिशुवर्गात होणारे संस्कार फार महत्वाचे असतात, असे म्हणतात की वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत माणुस ६ भाषा शिकु शकतो. म्हणुणच येथे जो उपक्रम चालविला जाणार आहे, तो चांगला आहे. व्हीडीऒ काँन्फरसींग आहे. शिवाय टी. व्ही. व्दारे एज्युकेशन टु होमची कल्पना राबविण्यात येईल, अभिजीत व अनिरूध्द शिर्के यांच्या सारख्या प्रयोगशिल व्यक्तीमत्वाकडुन हे घडत आहे. ते प्रशंसनिय आहे. या अगोदर त्यांनी बायोडीझेल, इथेनाँल, शेती, औषधे या सारख्या व्यवसायात ते सिध्द केले आहे. त्याला आता आयुवैद व योगाची साथ मिळते आहे. अजुनही बरचं काही करण्याची संधी आहे. नवनविन संस्था, शाळा, व्यक्ती यांच्याकडुन मिळणाय्रा कल्पना, योगदान यांचेही स्वागत होईल. या शाळेच्या माध्यमातुन डाँ अब्दुल कलाम यांचे सुसंस्कृत भारताचे स्वप्न नजीकच्या काळात साकार करता येईल. अनिरूध्द शिर्के म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पध्दतीत असलेल्या उणिवांमुळे Multiversity Gurukul पध्दतीची गरज वाटते. या पध्दतीत शास्त्र, शिक्षण ह संस्कार यांचा मिलाप साधण्यात आला आहे. ही पध्दत डाँ. भटकर सरकाय्रांच्या अथक परिश्रमातुन तयार झाली आहे. राँयसी इंटरनँशनल स्कुल ही आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर या गुरूकुल पध्दतीचा अवलंब करणार आहे. अधुनिक जगात संस्कारक्षम सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम याव्दारे एस्. एन. एस चँरिटेबल फाँउंडेशन करणार आहे. तसेच झरना सेंटर च्या माध्यमातुन योगा, कराटे, नृत्य, एरोबिक्स या विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. योगा या क्षेत्रात अगदी एक दिवसाच्या प्रशिक्षणापासुन पदविका व पदविपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातुन लाखो योगाचे शिक्षक तयार करण्याचे आव्हान ही स्विकारले आहे. मा पाडेकर सर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पुण्यातील बाणेर व विश्रांत वाडी मधील झरना सेंटरच्या माध्यमातुन हे काम होणार आहे. योग महर्षी पाडेकर म्हणाले, योग आणि रोग यांची सांगड घालुन आज योगाकडे पाहिल्या जाते जे दुर्दैवी आहे. योग हा केवळ रोगासाठी नसुन तो परिपुर्णतेसाठी आहे. योगा हो केवळ म्हातारा झाले की शिकावे असा गैरसमज आहे. डाँ भटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यासाठी भरपुर मेहनत घेत आहोत. अभिजीत शिर्के व अनिरूध्द शिर्के यांनी उपक्रम हाती घेतला आहे. तो स्तुत्य आहे. मुलांना लहान वयात योगाचे मार्गदर्शन केले तर ते चांगला समाज घ़डवतील. झरना सेंटरच्या उपक्रमास माझ्या मनापासुन शुभेच्छा व त्यांनी मी पुर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. अभिजीत शिर्के म्हणाले की, देशात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. तसेच नव्याने २५ लक्ष रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचा फायदा करून घेण्या करीता कुशल तंत्रज्ञान, व्यवसायीक शिक्षण व रोजगारभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राँयसीच्या अनेक शाखा देशात व परदेशात आगामी काळात सुरू करण्यात येणार आहेत सध्या स्थितीत प्ले ग्रुप व नर्सरीच्या माध्यमातुन सदर प्रकल्पास सुरूवात झाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रचना गोस्वामी यांनी केले, सुत्रसंचालन श्वेता चारी यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment