४५ किलो गांजा जप्त
पांढरकवडा - नागपुर कडुन आदिलाबाद कडे जाणाय्रा आंध्रप्रदेश परिवहन मंडळाच्या बस मधुन ४५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. बस मधुन गांजा नेल्या जात असल्याची गोपनिय माहिती पांढरकवडा पोलीसांना मिळताच पोलीसांनी तात्काळ बसस्थानक गाठले. परंतु पोलीस येण्याची कुणकुण लागताच बसमधिल चौघांनी पळ काढला पालिसांनी गांजा जप्त केला असुन पोलीस आरोपींचा कसुन शोध घेत आहे गांजा कुठे नेला जात होता याचाही शोध पांढरकवडा पोलिस घेत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
Saturday, March 14, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment